Ad will apear here
Next
पुणे शहरात स्वच्छ भारत अभियान
पुणे : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे पुणे रिजनल आउटरीच ब्युरो, केंद्रीय आवास व शहरी विकास मंत्रालय आणि पुणे महानगरपालिका यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने पुणे शहरातील हडपसर, सिंहगड रोड आणि भवानी पेठ या तीन ठिकाणी १८, २० आणि २२ डिसेंबर २०१८ या दिवशी स्वच्छ भारत अभियान या विशेष जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१८ डिसेंबरला हडपसर येथील साधना विद्यालय, २० डिसेंबरला सिहंगड रोडवरील नारायणराव सणस विद्यालय आणि २२ डिसेंबरला भवानी पेठेतील रफी अहमद किडवई उर्दू हायस्कूल या ठिकाणी सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत या अभियानांतर्गत विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.

यामध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी (ओला व सुखा कचरा) हिरव्या व निळ्या कुंड्यांचा वापर, प्लास्टिकचा वापर बंद करणे, नद्यांची स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, हगणदारीमुक्त शहर, आपल्या आजूबाजूचा परिसर व रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य, तसेच स्‍वच्‍छता आणि वैयक्तिक आरोग्‍य आदी महत्त्वाच्या मुद्यांवर या अभियानाद्वारे जनजागृती करण्यात येईल. शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांतून या अभियानाविषयी चित्रकला आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यातील विजेत्या आणि सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.

पुणे रिजनल आउटरीच ब्युरोतर्फे सांस्‍कृतिक कार्यक्रमाद्वारे स्वच्छता जनजागृती, महापालिकेद्वारे शहरातील स्वच्छतेविषयी माहिती, तसेच स्वच्छता अभियान राबवून विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

या अभियानाला पुणे महापालिकेचे लोकप्रतिनिधी, पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, पुणे येथील माहिती प्रसारण मंत्रालयाच्या रिजनल आउटरिच ब्युरो संचालक संतोष अजमेरा, पुणे महानगरपालकेचे सह आयुक्त राजेंद्र निंबाळकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, विविध विद्यालय-महाविद्यालयांचे प्राचार्य आणि मुखाध्यापक, तसेच विविध विभांगांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या अभियानात पुणे शहरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन फिल्ड आउटरीच ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZRMBV
Similar Posts
महापालिका अभियंता संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पुणे : ‘महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची सखोल व सचित्र माहिती असलेल्या या दिनदर्शिकेत प्रकल्पावर काम करणार्‍या अभियंत्यांची माहिती असल्यामुळे ही दिनदर्शिका मार्गदर्शक ठरेल,’ असे मत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी व्यक्त केले. पुणे महानगरपालिका अभियंता संघातर्फे
विविध प्रश्नांबाबत आमदार कुलकर्णी यांची बैठक पुणे : कोथरूड मतदारसंघातील विविध महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव व संबधित विभागाचे अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच बैठक घेण्यात आली.
‘बीडीपीचे संरक्षण, संवर्धन करू’ पुणे : ‘बीडीपीचे संरक्षण, संवर्धन करू. त्यासाठी नागरिक, तज्ज्ञांच्या प्रयत्नांमध्ये पालिका स्वतःची जबाबदारी पार पाडेल,’ असे आश्वासन पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले.
पुणे येथे ‘ई-कचरा व प्लॅस्टिक कचरा संकलन’ मोहीम पुणे : महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व्यवस्थापनाच्या सहभागाने पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात १७ डिसेंबर २०१७ रोजी ई-कचरा व प्लॅस्टिक कचरा संकलन मोहीम राबविली जाणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language